हजसाठी आगाऊ रक्कम भरण्यास मुदतवाढ

By Admin | Updated: April 5, 2017 06:20 IST2017-04-05T06:20:37+5:302017-04-05T06:20:37+5:30

केंद्राच्या हज कमिटी आॅफ इंडियामार्फत हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आगाऊ रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली

Extra payout for Haj | हजसाठी आगाऊ रक्कम भरण्यास मुदतवाढ

हजसाठी आगाऊ रक्कम भरण्यास मुदतवाढ

मुंबई : केंद्राच्या हज कमिटी आॅफ इंडियामार्फत हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आगाऊ रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. निवड झालेल्या यात्रेकरूंना १३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपये आॅनलाइन पेमेंट करावयाचे आहे.
या वर्षीच्या हज यात्रेसाठी येणाऱ्या शुल्काची निश्चिती अद्याप सौदी सरकारकडून झालेली नाही. त्यामुळे ड्रॉमध्ये पात्र यात्रेकरूंना आगाऊ स्वरूपात प्रत्येकी ५० हजार रुपये पहिल्या टप्प्यात भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र भाविकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यासाठी मुदतवाढ केली आहे.

Web Title: Extra payout for Haj