शिष्यवृत्तीच्या चौकशी पथकास मुदतवाढ

By Admin | Updated: March 20, 2016 02:29 IST2016-03-20T02:29:07+5:302016-03-20T02:29:07+5:30

सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकास (टास्क फोर्स) एक

Extension of scholarships to scholarship | शिष्यवृत्तीच्या चौकशी पथकास मुदतवाढ

शिष्यवृत्तीच्या चौकशी पथकास मुदतवाढ

मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकास (टास्क फोर्स) एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्यंकटेशम् या टास्कफोर्सचे प्रमुख आहेत. या टास्कफोर्सची नियुक्ती १५ जानेवारी रोजी करण्यात आली होती आणि त्यास ६० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, या प्रकरणात आणखी माहिती घेऊन चौकशी करणे आवश्यक असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने टास्कफोर्सला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Extension of scholarships to scholarship