म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ

By Admin | Updated: October 6, 2016 05:18 IST2016-10-06T05:18:17+5:302016-10-06T05:18:17+5:30

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या

Extension for registration and online from MHADA | म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ

म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या विक्रीसाठी नोंदणी आणि आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अर्जदारांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील स्वारगेट येथील पंडित नेहरू स्टेडियम येथे सोडत होईल. सोडतीमध्ये पुण्यातील मोरवाडी, म्हाळुंगे, भूखंडांचा समावेश आहे. 

आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी समाप्ती : २ नोव्हेंबर
सोडतीसाठी आॅनलाइन अर्जाची समाप्ती : ३ नोव्हेंबर
आॅनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक : ४ नोव्हेंबर
बँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : ५ नोव्हेंबर
स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक : १७ नोव्हेंबर
हरकतीवरील अपील, सुनावणी दिनांक : १९ नोव्हेंबर
अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध दिनांक : २१ नोव्हेंबर
सोडत : २४ नोव्हेंबर

Web Title: Extension for registration and online from MHADA