दहावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

By Admin | Updated: June 28, 2017 02:06 IST2017-06-28T02:06:47+5:302017-06-28T02:06:47+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै - आॅगस्ट महिन्यांत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत

Extension of filling up the application for Class X | दहावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

दहावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै - आॅगस्ट महिन्यांत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार असल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केले.
मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १३ जून रोजी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ ते २६ जूनपर्यंत आॅनलाइन आवेदनपत्र भरण्यास मुदत होती. पण अनेक शाळांना आॅनलाइन आवेदनपत्र भरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे मुदतवाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Extension of filling up the application for Class X