बांधकाम हटवण्यास भाजपाला मुदतवाढ
By Admin | Updated: July 20, 2016 06:04 IST2016-07-20T06:04:21+5:302016-07-20T06:04:21+5:30
भाजपाच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाचे बेकायदा बांधकाम सहा महिन्यांत हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने भाजपाला मार्चमध्ये दिला

बांधकाम हटवण्यास भाजपाला मुदतवाढ
मुंबई : भाजपाच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाचे बेकायदा बांधकाम सहा महिन्यांत हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने भाजपाला मार्चमध्ये दिला होता. भाजपाला अंलबजावणीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात उच्च न्यायालयाने भाजपाला कार्यालयाच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम सहा महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत हटवण्याचा आदेश दिला होता. मात्र, बांधकाम न हटवल्याने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ‘जनहित मंच’ने केली.
याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने भाजपाला बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती एनजीओला दिली.
सरकारने या कार्यालयासाठी १,२०० चौ. फूट जागा दिली होती. मात्र, कालांतराने भाजपने यावर अतिक्रमण करून ४, ६२८ चौ. फूट जागा बळकावली. १९९१च्या विकास आराखड्यात नेहरू गार्डन मनोरंजन पार्क असूनही इथे एमटीडीसी, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज, महिला आर्थिक विकास महामंडळ, झुणका भाकर केंद्र इत्यादींना जागा देण्यात आली आहे. याविरुद्ध ‘नरिमन पॉइंट चर्चगेट सिटिझन वेल्फेअर ट्रस्ट’ ने याचिका केली होती. (प्रतिनिधी)