गावितांच्या चौकशीसाठी ‘एसीबी’ला मुदतवाढ
By Admin | Updated: January 13, 2015 05:03 IST2015-01-13T05:03:01+5:302015-01-13T05:03:01+5:30
माजी मंत्री व नंदूरबारचे भाजपचे आमदार डॉ़ विजयकुमार गावित यांच्याविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने

गावितांच्या चौकशीसाठी ‘एसीबी’ला मुदतवाढ
मुंबई : माजी मंत्री व नंदूरबारचे भाजपचे आमदार डॉ़ विजयकुमार गावित यांच्याविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दोन महिन्यांची मुदतवाढ दिली़
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ ही चौकशी करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती ‘एसीबी’ने न्यायालयाला केली़ याला याचिकाकर्त्यांचे वकील उदय प्रकाश वारूंजीकर यांनी विरोध केला़ याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विभागाला पुरेसा वेळ दिला गेला आहे़ त्यामुळे वाढीव मुदत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद अॅड़ वारूंजीकर यांनी केला़
याप्रकरणी नाशिक येथील आदिवासी भागातील विष्णु मुसळे व अन्य तिघाजणांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ त्यानुसार गावित हे आधी शिक्षक होते़ तसेच त्यांचा भाऊ शरद गावित हा चर्तुथ श्रेणी कामगार होता़ त्यावेळी त्यांचे उत्पन्न हजारोंमध्ये होते़ आता त्यांचे उत्पन्न कोटी रूपयांच्या घरात गेल्यामुळे चौकशीची मागणी होत आहे.