आरोप निश्चितीसाठी मुदतवाढ द्या
By Admin | Updated: November 17, 2016 03:43 IST2016-11-17T03:43:43+5:302016-11-17T03:43:43+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात आरोप निश्चितीसाठी सीबीआयने

आरोप निश्चितीसाठी मुदतवाढ द्या
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात आरोप निश्चितीसाठी सीबीआयने न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे. स्कॉटलंड यार्डला पाठवलेल्या गोळ्यांचा अहवाल येईपर्यंत मुदत मिळावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे. यावरील पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलामधील गोळ्या तपासणीसाठी स्कॉटलंड यार्डला पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. हा अहवाल मिळेपर्यंत न्यायालयाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सीबीआयचे वकील मनोज चडलान यांनी केली. त्याला तावडेचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आक्षेप घेतला. (प्रतिनिधी)