ऑगस्टमध्ये होणार मनपाची हद्दवाढ!
By Admin | Updated: July 26, 2016 02:03 IST2016-07-26T02:03:27+5:302016-07-26T02:03:27+5:30
नगर विकास खात्याला ग्राम विकास विभागाच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

ऑगस्टमध्ये होणार मनपाची हद्दवाढ!
- नरेश डोंगरे
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्यातून सोमवारी मध्यरात्री एका आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. विक्की बागडे असे आरोपीचे नाव असून तो प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याचा आरोपी होता. त्याने सोमवारी मध्यरात्री पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहत ठाण्यातून पळ काढला. ही घटना लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पळालेल्या आरोपीला शोधण्यासाठी जरीपटका पोलिसांची विविध पथके परिसरात शोधमोहीम राबवू लागली. विशेष म्हणजे, अख्खे पोलीस ठाणे आरोपीला शोधण्यासाठी फिरत होते. मात्र, खरडपट्टी निघू शकते, या भीतीमुळे या आरोपी पलायनाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांना देण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे अन्य वरिष्ठ अधिकारीच काय, नाईट राउंडवर असलेले विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांना सुद्धा या घटनेची रात्री १ वाजेपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. माहिती कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडेही याबाबत कसलीच माहिती नव्हती. जरीपटका ठाण्यातील फोन उचलून बोलायला कुणी तयार नव्हते. प्रस्तूत प्रतिनिधीने आपल्या एका सहका-याला पोलीस ठाण्यात पाठवून घटनेची माहिती घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, उपस्थित कोणत्याच पोलीस कर्मचा-याने याबाबतची माहिती देण्यास नकार दिला.