शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी; KCR यांच्याशी वाढली होती जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:51 IST

पक्षशिस्तीचे पालन न करणे यामुळे आपणांस पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात येते याची नोंद घ्यावी असं राष्ट्रवादीने पत्रकात म्हटलं आहे. 

मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या बीआरएस पक्षाने राष्ट्रीय उभारणी घेत अनेक राज्यात शिरकाव केला आहे. त्यात महाराष्ट्रातही नांदेड इथं केसीआर यांनी सभा घेत अनेक नेत्यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेतला. आता याच पक्षाशी जवळीक वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माजी आमदार शंकर धोंडगे यांना उद्देशून पत्रक काढले आहे. त्यात म्हटलंय की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्यप्रमुख या पदावर कार्यरत आहात. असे असतानाही आपणांस वारंवार सूचना देऊनदेखील पक्षविरोधी वर्तन करणे, पक्षशिस्तीचे पालन न करणे यामुळे आपणांस पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात येते याची नोंद घ्यावी असं म्हटलं आहे. 

कोण आहेत शंकर धोंडगे?शंकर धोंडगे हे कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी शेतकरी चळवळीत अनेक आंदोलने केली आहेत. धोंडगे हे शरद पवारांच्या जवळचे मानले जायचे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या किसान सभेच्या राज्यप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून शंकर धोंडगे यांची जवळीक तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी वाढली होती. धोंडगे यांची केसीआर यांच्याशी काही दिवसांपूर्वी ३ तास चर्चा झाल्याचेही म्हटलं जाते. त्यानंतर शंकर धोंडगे हे बीआरएसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. 

मागे मेळाव्यात शंकर धोंडगे म्हणाले होते की, तेलंगणा राज्यात मागील ८ वर्षात होत्याचं नव्हते झाले. महाराष्ट्रात धनाची नाही आणि मानाची कमी नाही पण तरीही शेतकरी आत्महत्या का करतात? माझा कुणावारही राग नाही. कुणावर टीका करणार नाही. माझ्या राजकारणात चुका झाल्या असतील. आजची परिस्थिती स्थिर नाही. मी काही दिवसांत माझी भूमिका जाहीर करणार आहे असं त्यांनी जाहीर केले होते.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस