पर्यटकांची संख्या वाढल्याने एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

By Admin | Updated: May 28, 2016 13:46 IST2016-05-28T13:43:57+5:302016-05-28T13:46:50+5:30

शनिवार व रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर पर्यटकांची गर्दी वाढल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक मंदावली आहे.

Expressway traffic congestion due to increase in the number of tourists | पर्यटकांची संख्या वाढल्याने एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

पर्यटकांची संख्या वाढल्याने एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

लोणावळा , दि. २८ (वार्ताहर) - शनिवार व रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर पर्यटकांची गर्दी वाढल्याने  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक मंदावली आहे.
  ऊन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांनी गर्दी केली आहे. तसेच महाबळेश्वर व अन्य पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढल्याने एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या मार्गावरील वाहतुक मंदावली असून जवळपास तिन ते साडेतिन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणावळाशहरात देखिल मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.

Web Title: Expressway traffic congestion due to increase in the number of tourists