एक्स्प्रेस-वेवर अपघात; २ ठार
By Admin | Updated: April 29, 2016 06:14 IST2016-04-29T06:14:19+5:302016-04-29T06:14:19+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री खोपोली एक्झिट येथील वळणावर एक कंटेनर व पिकअप जीपमधे भीषण अपघात झाला.

एक्स्प्रेस-वेवर अपघात; २ ठार
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री खोपोली एक्झिट येथील वळणावर एक कंटेनर व पिकअप जीपमधे भीषण अपघात झाला. अपघातात कंटेनरचालक व पिकअप जीपमधील खालापूरचेच शकूर शेख असे दोघे ठार झाले. ही धडक एवढी जोरात होती की त्या जिपसह तो कंटेनर रस्त्याचा कठडा तोडून बाहेर गेला. त्यात कंटेनरचालक रामजी यादव हा १०० फुटांवर फेकला गेला. हा विचित्र अपघात मध्यरात्री घडल्याने सकाळपर्यंत अपघात झाल्याचे कोणालाही समजलेच नाही. त्यामुळे मदत मिळण्यास उशीर झाला. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना शकूर शेख यांचा मृतदेह पिकअप जीपमध्ये आढळून आला.