एक्स्प्रेस-वेवर ३ बसचा अपघात

By Admin | Updated: December 27, 2014 04:26 IST2014-12-27T04:26:52+5:302014-12-27T04:26:52+5:30

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळ्याजवळ शुक्रवारी सकाळी तीन बस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोन चालकांसह एक

Express-Waver 3 Bus Accident | एक्स्प्रेस-वेवर ३ बसचा अपघात

एक्स्प्रेस-वेवर ३ बसचा अपघात

लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळ्याजवळ शुक्रवारी सकाळी तीन बस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोन चालकांसह एक प्रवासी जखमी झाला़ मात्र या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती़
द्रुतगती महामार्गावर सकाळी ९च्या सुमारास एका कंटेनरला ओव्हरटेक करताना एका मोटारीने अचानक वेग कमी केला. त्यामुळे तिला वाचविण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या एका खासगी बसच्या चालकाने ब्रेक मारला. त्याचवेळी मागून भरधाव आलेली परिवहन महामंडळाची ‘शिवनेरी’ बस या खासगी बसवर जोरात आदळली. तर पाठोपाठ असलेली आणखी एक खासगी बस ‘शिवनेरी’वर आदळली. यामध्ये शिवनेरीचा चालक संदीप नारायण लोखंडे (रा़ पुणे) व सुरभी भरत देसडला (रा़ पुणे) यांच्यासह एका खासगी बसचा चालक जखमी झाला आहे़ या अपघातानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग बंद झाला होता़ त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वलवण येथे बंद करत ती राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली़ लोणावळ्यात अचानक वाहनांची संख्या वाढल्याने राष्ट्रीय महामार्गावर ३ ते ४ कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले़

Web Title: Express-Waver 3 Bus Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.