एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी

By Admin | Updated: August 17, 2015 00:50 IST2015-08-17T00:50:50+5:302015-08-17T00:50:50+5:30

शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या (मंगळवार) सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाले आहेत

Express tremendous traffic congestion | एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी

एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी

लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या (मंगळवार) सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाले आहेत. परिणामी शनिवारी सकाळपासून द्रुतगती महामार्गासह लोणावळ्यात प्रचंड वाहतूककोंडी झाली.
मुंबईकर, तसेच पुणेकर पर्यटकांनी शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्याच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे खंडाळा घाटात तसेच, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ द्रुतगती महामार्गावर दरडग्रस्त भाग असलेल्या खंडाळा बोगद्याजवळील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या तीनही लेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पुण्याकडून तीन लेनवरून येणारी वाहतूक येथे एका लेनवर घ्यावी लागत असल्याने या भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती़ अखेर ही कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी सर्व हलकी वाहने वलवण येथून राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात वळविण्यात आली.

Web Title: Express tremendous traffic congestion