एक्स्प्रेसचा ‘आॅनलाइन’ काळाबाजार

By Admin | Updated: March 13, 2015 05:33 IST2015-03-13T05:33:07+5:302015-03-13T05:33:07+5:30

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आॅनलाइन पद्धतीने प्रवाशांकडून विकत घेतली जात असतानाच या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करण्याचा काळाबाजार

Express 'online' black market | एक्स्प्रेसचा ‘आॅनलाइन’ काळाबाजार

एक्स्प्रेसचा ‘आॅनलाइन’ काळाबाजार

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे आॅनलाइन पद्धतीने प्रवाशांकडून विकत घेतली जात असतानाच या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करण्याचा काळाबाजार सध्या जोरात सुरू आहे. मध्य रेल्वेने वाशी येथे टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यांत तिकिटांची अनधिकृपणे विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १११ तिकिटे हस्तगत करण्यात आली. हस्तगत करण्यात आलेल्या तिकिटांपैकी ६0 तिकिटे ही एक विशिष्ट असे सॉफ्टवेअर वापरून काढण्यात आली आहेत. सध्या देशभरात अशी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असून, त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. या सॉफ्टवेअरची विक्री उत्तर प्रदेशातून होत असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) आलोक बोहरा यांनी सांगितले.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आॅनलाइन तिकीट मिळविण्यासाठी आयआरसीटीसीमार्फत आरक्षण केले जाते. अशाप्रकारे आरक्षण होत असतानाच दलालांनी अनेक वेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनधिकृतपणे तिकीट देण्याचा धंदा सुरू केला आहे. आरपीएफने टाकलेल्या एका धाडीमध्ये ही बाब समोर आली आहे. वाशीतील सेक्टर-९ आणि १0मध्ये छापा टाकून रामकृष्ण झा, रामदास बुऱ्हाडे आणि अजित प्रसाद या तिघांना अटक केली. यापैकी रामकृष्ण झा याने वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आठ बोगस ओळखपत्रे बनविली होती. यातून तब्बल २ लाख ११ हजार ५८0 रुपये किमतीची ६0 तिकिटे काढली होती. आरपीएफने ही तिकिटे हस्तगत केली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Express 'online' black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.