एक्स्प्रेसवर कोसळली दरड; ११ ठार, ६० जखमी

By Admin | Updated: February 14, 2015 04:33 IST2015-02-14T04:33:53+5:302015-02-14T04:33:53+5:30

कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर-एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे

Express crashes; 11 killed, 60 injured | एक्स्प्रेसवर कोसळली दरड; ११ ठार, ६० जखमी

एक्स्प्रेसवर कोसळली दरड; ११ ठार, ६० जखमी

अनेकल (कर्नाटक) : कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर-एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले. सकाळी ७.३० वाजता बंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुलदरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला.
बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बंगळुरूहून रवाना झाली होती. घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की,
मदतकार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.

Web Title: Express crashes; 11 killed, 60 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.