शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून १५ टन संत्र्यांची दुबईला निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 19:41 IST

राज्यामध्ये अमरावती आणि नागपुर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन

ठळक मुद्देपणन मंडळ-अपेडाचा उपक्रम : चाळीस टन निर्यातीचे उद्दीष्टतब्बल चाळीस टन कंटेनर निर्यातीचे नियोजन असल्याची माहिती

पुणे : अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅण्ड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी (अपेडा) आणि कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातून तब्बल साडेपंधरा टन संत्र्याची दुबई येथे निर्यात करण्यात आली. प्रथमच वॅक्सींगची प्रक्रिया करुन संत्र्यांची निर्यात करण्यात आली असून, तब्बल चाळीस टन कंटेनर निर्यातीचे नियोजन असल्याची माहिती पणन मंडळाने दिली. अमरावती जिल्ह्यातील साडेपंधरा टन संत्री एस.डी.एफ. प्रोडकशन प्रा. लि. कंपनी मार्फत पाठविण्यात आली. कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील पॅक हाऊस मध्ये संत्र्याची प्रथम प्रतवारी करण्यात आली. संत्रा पाण्याने स्वच्छ करुन त्यावर वॅक्सींग करुन निर्यात करण्यात आली आहेत. राज्यामध्ये अमरावती आणि नागपुर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन होते. संत्र्याच्या निर्यातीमधील अडचणी लक्षात घेऊन पणन मंडळाने संत्रा वॅक्सींग करुन निर्यात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रथमच संत्र्याची वॅक्सींग करुन निर्यात करण्यात आली आहे. तसेच यावेळी संत्रा बॉक्स पॅकींग न करता प्रथमच १० किलोच्या क्रेट्स मध्ये संत्री ठेवून, कंटेनरने निर्यात केली आहेत. कंटेनर १९ फेब्रुवारी रोजी दुबई येथे पोहचेल.निर्यातीची प्रक्रिया कृषी पणन मंडळ आणि अपेडा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित निर्यात यशस्वी झाल्यास या हंगामात सुमारे ४० कंटेनर निर्यातीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी पणन मंडळाने दिली. दुबई येथील आयातदार अल्ताफ हुसेन आणि रियास आणि निर्यातदार सोनल लोहारीकर, अपेडाचे सहायक सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटिल, हॉर्टीकलचर डेव्हलपमेंट ऑफिसर अभिमन्यू माने, कृषी व्यवसाय पणन तज्ज्ञ जंगम तुषार, नितीन मेरे, संजय गुरव यावेळी उपस्थित होते. -----------

टॅग्स :PuneपुणेOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलagricultureशेतीFarmerशेतकरी