‘आयएम’ला स्फोटके पुरविणारे गजाआड

By Admin | Updated: March 31, 2015 03:56 IST2015-03-31T03:56:15+5:302015-03-31T03:56:15+5:30

: इंडियन मुजाहिददीनला बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आवश्यक तो स्फोटकांचा साठा पुरविणाऱ्या दोन अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केली

Explosives providing explosives to 'IM' | ‘आयएम’ला स्फोटके पुरविणारे गजाआड

‘आयएम’ला स्फोटके पुरविणारे गजाआड

मुंबई : इंडियन मुजाहिददीनला बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आवश्यक तो स्फोटकांचा साठा पुरविणाऱ्या दोन अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केली . डॉ. सय्यद इस्माईल अफाक अलीम लंका(३६), सददाम हुसेन फिरोज खान(२८) अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. या दोघांनी पुरविलेल्या स्फोटकांचा वापर इंडियन मुजाहिददीनने मुंबईतल्या १३/७ आणि पुण्याच्या जर्मन बेकरी, जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटात केल्याचा दाट संशयआहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवडयात बंगळुरू पोलिसांनी एका गुन्हयात या दोघांना कर्नाटकच्या भटकळ गावातून अटक केली होती. चौकशीत या दोघांचे इंडियन मुजाहिददीनच्या अहमद जरार सिद्धिबाप्पा उर्फ यासीन भटकळ, अख्तर हुसेन उर्फ हडडी आणि जीया उर रेहमान उर्फ वकास यांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळताच बंगळुरू पोलिसांनी दहशतवादाच्या दृष्टीकोनातून या दोघांची कसून चौकशी केली. त्यानंतर एटीएसने या दोघांचा ताबा घेत त्यांना मुंबईत आणले. या दोघांना १३ जुलै २०११ रोजी मुंबईतल्या झवेरी बाजार, आॅपेरा हाऊस, दादर येथे घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांच्या गुन्हयात अटक केली. लंका, खान यांनी पुरविलेल्या स्फोटकांच्या आधारेच मुजाहिददीनने मुंबईत बॉम्ब तयार केले आणि ते या तीन ठिकाणी पेरले.
एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपींनी याआधी अनेकदा इंडियन मुजाहिददीनला स्फोटके पुरविलेली आहेत. महाराष्ट्रातील इंडियन मुजाहिददीनच्या बहुतांश सर्वच कारवायांमध्ये या दोघांचा सहभाग असावा, असा संशय आहे. मंगळवारीया दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल. पोलीस कोठडीत या दोघांकडे त्यासंबंधी कसून चौकशी केली जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे आयएमच्या संपर्कात कसे आले, कधीपासून आहेत, यांनी कितीवेळा कोणती स्फोटके आयएमला पुरवली, त्याचा वापर कोणत्या स्फोटांमध्ये झाला, स्फोटकांच्या बदल्यात त्यांना आयएमने काय दिले, आयएम व्यतिरिक्त अन्य कोणत्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते, आहेत या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी लंका व खान यांची एटीएस कसून चौकशी करणार आहे.

Web Title: Explosives providing explosives to 'IM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.