रत्नागिरीत एमआयडीसीत स्फोट, मुंबई-गोवा महामार्गावर धुराचे लोट
By Admin | Updated: July 28, 2016 14:38 IST2016-07-28T14:38:59+5:302016-07-28T14:38:59+5:30
रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत घरडा केमिकलच्या प्लॉट क्रमांक दोन मध्ये मोठा स्फोट झाला आहे.

रत्नागिरीत एमआयडीसीत स्फोट, मुंबई-गोवा महामार्गावर धुराचे लोट
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २८ - रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत घरडा केमिकलच्या प्लॉट क्रमांक दोन मध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे मुंबई-गोवा महामार्गावर धुराचे लोट पसरले असून, वाहतुकीला अडथळे येत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत शक्तीशाली स्फोट झाला होता. या स्फोटात पाचपेक्षा जास्तजण ठार झाले होते. या स्फोटामुळे डोंबिवलीतील काही किमीचा परिसर हादरला होता. अनेक घर, दुकानांच्या काचा फुटल्या होत्या.