भूसुरुंगाच्या स्फोटाने कोणसई बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: April 13, 2015 05:24 IST2015-04-13T05:24:34+5:302015-04-13T05:24:34+5:30
भूमाफियांनी आणि खदान मालकांनी बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट करून दगड पाडण्याचे काम

भूसुरुंगाच्या स्फोटाने कोणसई बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात
वसंत भोईर, वाडा
भूमाफियांनी आणि खदान मालकांनी बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट
करून दगड पाडण्याचे काम सुरू केल्याने तालुक्यातील कोणसई येथील बंधाऱ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. या बंधाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोणसई, जामघर, लखमापूर ग्रामपंचायतींच्या पाणीयोजना बंद पडून या गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाडा पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाकडून गेल्या वर्षी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करून वैतरणा नदीवर कोणसई गावालगत हा बंधारा बांधला. मात्र भूमाफियांनी आणि खदान मालकांकडून बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट केले जात आहे. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी कोणसई ग्रामपंचायतीने केली आहे. यासंदर्भात महिनाभरापूर्वी तहसीलदारांना निवेदन दिल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग सुरंग यांनी दिली.