विखे कारखान्यातील स्फोटाचे गूढ कायम
By Admin | Updated: April 8, 2016 02:48 IST2016-04-08T02:48:41+5:302016-04-08T02:48:41+5:30
विखे पाटील साखर कारखान्यातील मळीच्या टाकीची क्षमता पाच हजार मेट्रिक टन होती़ स्फोटाच्या वेळी टाकीत तीन हजार मेट्रिक टन मळी असल्याचे औद्योगिक

विखे कारखान्यातील स्फोटाचे गूढ कायम
लोणी/अहमदनगर : विखे पाटील साखर कारखान्यातील मळीच्या टाकीची क्षमता पाच हजार मेट्रिक टन होती़ स्फोटाच्या वेळी टाकीत तीन हजार मेट्रिक टन मळी असल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे़ त्यामुळे हा स्फोट कशामुळे झाला, याचा अंदाज येत नाही़ व्यवस्थापनाकडून तांत्रिक माहिती आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़
सहायक संचालक संदीप लोंढे यांच्यासह पथकाने गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली़ मळीची टाकी १९८९ मध्ये बसविण्यात आली आहे़ टाकी बसविली, त्या वेळची क्षमता, तिचा आराखडा, चाचणी अहवाल, प्लेट आदी तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे़ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने २६ आॅक्टोबर २०१५ला कारखान्याची पाहणी केली होती़ त्यानंतर सात महिन्यांनी स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)