शोषण करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

By Admin | Updated: August 31, 2015 01:07 IST2015-08-31T01:07:51+5:302015-08-31T01:07:51+5:30

‘करणी झाली आहे,’ असे महिलांना सांगून भस्माचे उपचार करण्याच्या बहाण्याने विवस्त्र करणाऱ्या तसेच लॉजवर नेऊन अत्याचार करणाऱ्या सहकारनगरमधील भोंदूबाबाचे स्टिंग

Exploited Baba's Exposure | शोषण करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

शोषण करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

दीपक जाधव, पुणे
‘करणी झाली आहे,’ असे महिलांना सांगून भस्माचे उपचार करण्याच्या बहाण्याने विवस्त्र करणाऱ्या तसेच लॉजवर नेऊन अत्याचार करणाऱ्या सहकारनगरमधील भोंदूबाबाचे स्टिंग आॅपरेशन करून एका कुटुंबाने त्याला रंगेहाथ पकडून दिले. दोन तासांच्या थरारक पाठलागानंतर या भोंदूबाबाला जेरबंद करण्यात आले.
सहकारनगरमध्ये नामनाथ बाबा म्हणून ओळख असलेल्या या बाबाचे खरे नाव पांडुरंग लक्ष्मण साळवी (७५) असे आहे. इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने नामनाथ बाबाला गुरू केले होते. दोन वर्षांपासून ते त्याची मनोभावे सेवा करीत होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त त्या बाबाच्या दर्शनाला घरातील नवविवाहित सून गेली असता त्याने ‘तुझ्यावर सासूने करणी केली आहे, तुझे त्रास
दूर करायचे असतील तर भस्माचे उपचार घ्यावे लागतील’, असे सांगितले. आणि तिला एकटीला बोलावून तिच्या शरीराला भस्म लावले. रविवारी सकाळीही त्याने तिला फोन करून भस्म लावण्यासाठी एकटी घरी ये, असे सांगितले.
तेव्हा तिने नवरा,
सासू, सासरे यांना विश्वासात घेऊन घडल्या प्रकाराची कल्पना दिली.
त्यानंतर सून बाबाच्या घरी पोहचली, त्या वेळी त्याने घरात खूप गर्दी आहे, आपण बाहेर जाऊ,
असे सांगितले आणि तिला दुचाकीवर बसवून बाहेर घेऊन जाऊ लागला.
त्या वेळी त्याच्या घराजवळ लपून बसलेल्या सुनेच्या घरच्यांनी त्यांचा रिक्षातून पाठलाग सुरू केला. मंडई येथील एका लॉजवर तो सुनेला घेऊन गेला, तिथे रूम घेत असतानाच सुनेच्या नातेवाइकांनी त्याची गचांडी
धरून रंगेहाथ पकडले. त्यानंतर मंडई
चौकीत त्याला पोलिसांच्या त्
ााब्यात देण्यात आले.
गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरू होते.

Web Title: Exploited Baba's Exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.