शाळेत चिमुकलीचे शिक्षकाकडूनच शोषण

By Admin | Updated: August 22, 2016 23:04 IST2016-08-22T23:04:26+5:302016-08-22T23:04:26+5:30

नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीसोबत गेल्या दोन आठवड्यांपासून तेथील एक शिक्षकच अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

Exploit by a teacher of a school teacher | शाळेत चिमुकलीचे शिक्षकाकडूनच शोषण

शाळेत चिमुकलीचे शिक्षकाकडूनच शोषण

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २२ : नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीसोबत गेल्या दोन आठवड्यांपासून तेथील एक शिक्षकच अश्लील चाळे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच मुलीच्या नातेवाईकांनी सोमवारी शाळेत जाऊन या शिक्षकाला बेदम चोप देत जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन केले.

अहेमद खान अमीन खान (३७, रा. मंजूरपुरा, हर्षनगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगिलते की, नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल या शाळेत शिक्षण घेणारी पीडित आठ वर्षीय मुलगी शनिवारी शाळेतून आल्यापासून प्रचंड घाबरलेली असल्याचे तिच्या घरच्यांच्या लक्षात आले. ती आजारी असावी, असा घरच्यांचा समज झाला. त्यामुळे घरचे तिला दवाखान्यात घेऊन गेले.

त्यानंतरही ती भेदरलेलीच होती. शेवटी या मुलीला तिच्या आजीने विश्वासात घेऊन विचारपूस केली. अखेर या चिमुकलीने आपले मन मोकळे केले. शाळेतील एक शिक्षक आपल्यासोबत अश्लील चाळे करीत असल्याचे तिने आजीला सांगितले. हे ऐकून घरच्यांना धक्काच बसला. सोमवारी सकाळीच या चिमुकलीचे पालक आणि नातेवाईक तिला घेऊन ह्यतोह्ण शिक्षक कोण आहे, हे पाहण्यासाठी आले. एक - एक शिक्षक दाखवून तिला विचारणा करण्यात आली. अखेर जेव्हा तिला अहेमद खानसमोर आणण्यात आले, तेव्हा तिने त्याच्याकडे बोट दाखवित हा शिक्षक आपल्यासोबत अश्लीच चाळे करीत असल्याचे सांगितले. त्याला पाहताच नातेवाईकांचा राग अनावर झाला.

मग नातेवाईकांनी शाळेतच या शिक्षकाला बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. या शिक्षकाविरुद्ध मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर वसुरकर यांनी दिली.

Web Title: Exploit by a teacher of a school teacher