अफगाणी निर्वासित तरुण रेल्वेतून पसार
By Admin | Updated: May 16, 2016 02:21 IST2016-05-16T02:21:03+5:302016-05-16T02:21:03+5:30
दोन अफगाणी निर्वासित तरुणांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला़ ही घटना झेलम एक्स्प्रेसमध्ये रविवारी पहाटे गाळण स्थानकाजवळ घडली़

अफगाणी निर्वासित तरुण रेल्वेतून पसार
भुसावळ (जि.जळगाव) : खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन अफगाणी निर्वासित तरुणांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला़ ही घटना झेलम एक्स्प्रेसमध्ये रविवारी पहाटे गाळण स्थानकाजवळ घडली़
हाफिज उल्लाह (२९) व अब्ब्दुल्ला हाजी बशीर (४६) यांना १ एप्रिलला नवी दिल्लीत सैय्यद अजमेर आयी या अफगाणी तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक झाली होती. तर दोन आरोपी पळाले होते. ते पुण्यात असल्याचे कळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना पुण्यात अटक केली. पुणे न्यायालयातून ट्रांझीट रिमांड घेत झेलम एक्स्प्रेसने नवी दिल्लीकडे प्रवासादरम्यान आरोपींनी शौचाला जाण्याचा बहाणा केला. पोलीस त्यांना नेत असताना गाडी सुरू झाली. दोघांनीही पोलिसांना हिसका देत बाहेर उडी मारली. मात्र तोपर्यंत रेल्वेने वेग घेतल्याने पोलीस हतबल ठरले. (प्रतिनिधी)