शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 07:51 IST

Cabinet Expansion : गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला.

छत्रपती संभाजीनगर / मुंबई -  गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत सुरू होत असून, त्या आधीच विस्तार होईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ९ ऑगस्ट २०२२ रोजी १८ मंत्र्यांचा समावेश करत विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर लवकरच विस्तार करू, असे शिंदे, फडणवीस यांनी सातत्याने सांगितले. मात्र विस्तार नेमका कधी करणार हे जाहीर केले नव्हते. फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना विस्तार याच महिन्यात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्यात विस्तार होणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १० जुलैपूर्वी होण्याची शक्यता आहे.

शिंदे समर्थक खासदारांना मोदी सरकारमध्ये संधी!शिदे-फडणवीस हे दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटले आणि त्यांनी विस्ताराबाबत चर्चा केली. शहा यांनी विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला. शिंदे यांच्या समर्थक खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री असतील. विदर्भातील एकाला संधी दिली जाऊ शकते, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

फेरबदलासह विस्तार !- राज्य मंत्रिमंडळात सध्या २० मंत्री आहेत. आणखी २३ मंत्री घेतले जाऊ शकतात. १२ ते १५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता आहे.- हा केवळ विस्तार नसेल तर फेरबदलही केले जाऊ शकतात. काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. विस्तारामध्ये काही धक्केही असतील.-  लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप नवीन मित्र जोडण्याची शक्यता असून, त्याचे प्रतिबिंब विस्तारात उमटण्याची शक्यता आहे. बंद दाराआड त्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना