शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुण्यांनी दिली थंडीची ‘वर्दी’; कोकणात सीगल पक्ष्यांचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:33 IST

सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात

शिवाजी गोरेदापोली : परतीच्या पावसाच्या वाढलेल्या मुक्कामामुळे साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, थंडीची चाहूल देणारे विदेशी सीगल पक्षी दापोलीच्या किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे दापोलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास ते कोकण किनाऱ्याकडे झेप घेतात आणि थंडीच्या हंगामात स्थिरावतात.रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदर, दापोली, गणपतीपुळे, आरे-वारे यांसारख्या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. समुद्रावर उडणाऱ्या या पांढऱ्या पंखांच्या झुंडी, वाऱ्याशी खेळणारी त्यांची उडाण आणि त्यांच्या किलबिलाटाने साऱ्या किनारपट्टीवर थंडीची चाहूल निर्माण झाली आहे.सिगल्सच्या आगमनामुळे कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनाही कुतूहल वाटू लागले आहे. समुद्रावर दिसणाऱ्या या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांसह पक्षिप्रेमींची लगबग सुरू हाेते.

काेकणच्या समुद्रकिनाऱ्याचे आकर्षणया पक्ष्यांच्या आगमनामागे कोकणातील उबदार हवामान आणि समृद्ध सागरी अन्नसाठा हे मुख्य कारण आहे. किनाऱ्यावर सहज मिळणारे छोटे मासे, कोळंबी आणि सागरी कीटकांवर हे पक्षी उपजीविका करतात. कोकणाचा स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण या पक्ष्यांना आकर्षित करते. फेब्रुवारीच्या अखेरीस, पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पुन्हा आपल्या मायदेशी परततात.