शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रक्ताच्या नात्यात स्टॅम्प ड्युटी माफ !

By admin | Updated: March 28, 2015 02:03 IST

मुलांच्या किंवा रक्ताच्या नात्यामध्ये जमीन वा शेतजमीन नावावर करताना मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्याची गरज राहणार नाही,

एकनाथ खडसेंची घोषणामुंबई : मुलांच्या किंवा रक्ताच्या नात्यामध्ये जमीन वा शेतजमीन नावावर करताना मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. मात्र त्यासाठी वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रक्ताच्या नात्यात मालमत्ता, जमीन हस्तांतरित करताना आतापर्यंत पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मात्र आता ही प्रक्रिया सुकर झाली आहे. विधानसभेत बुधवारी रात्री उशिरा पुरवणी मागण्यावर उत्तर देताना खडसे यांनी मुद्रांक शुल्क माफीची घोषणा केली. तसेच जात, उत्पन्न आणि अधिवास (डोमिसाइल) अशा विविध प्रमाणपत्रांसाठी देखील यापुढे स्टॅम्पपेपरची गरज भासणार नाही. साध्या कागदावर मसुदा लिहून ही प्रमाणपत्रे प्राप्त करता येतील. मात्र ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यास अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद होऊन दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.जमीन खरेदी-विक्री व फेरफार नोंदी लवकरच ई पद्धतीने करण्यात येणार असून लिजवर दिलेल्या जमिनीवर बांधकामे झाली तर, रेडी रेकनरनुसार किंमत घेऊन त्या जमिनी सोसायट्यांना मालकी हक्काने देण्यात येणार आहेत. तसेच जमिनीसंबंधी प्रलंबित अपील्स वेगाने निकाली काढण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी (अपील) हे पद निर्माण करणार तसेच उपजिल्हाधिकाऱ्याची ४३ रिक्त पदे तलाठ्यांच्या रिक्त जागा ३ महिन्यांत भरू, अशी ग्वाही देतानाच पानंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढणार, असे खडसे म्हणाले. इतर घोषणाकेंद्र सरकारचा कृषि विद्यापीठ संशोधन व मार्गदर्शन प्रकल्प सुरू करणार, मनरेगामार्फत फळबाग योजना राबविणार, पशुवैद्यकांच्या ३०० जागा/पदे भरणार, उत्तम देशी गायींची पैदास करण्यासाठी पुण्याजवळ वीर्य विकास केंद्र केंद्र शासनाच्या मदतीने सुरु करणार, मुंबईत आरे येथे गोकुलग्राम सुरू करणार व शासकीय दुग्धशाळामध्ये दूध पावडरनिर्मिती, अंगणवाड्यांना दूध पावडर पुरवणार, केळीपासून बियर व वाइन बनविण्याच्या प्रकल्पांना मंजूरी देणार, गोड्या पाण्यातील मासेमारी खासगी सहभाग व व्यावहारिक दृष्टिकोण ठेऊन धोरण ठरवणार. (विशेष प्रतिनिधी)