शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 1:56 PM

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला धक्का; काँग्रेसची सरशी

मुंबई: राज्यातील सहा जिल्हा परिषदांचा निकाल काल जाहीर झाला. या सहापैकी केवळ एका जिल्हा परिषदेत भाजपाला बहुमत मिळालं. भाजपाला सर्वात मोठा धक्का नागपुरात बसला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जिल्हा परिषद गमावण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा नेमकी कुठे कमी पडली, याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत सरपंच अवॉर्ड कार्यक्रमात सांगितलं. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. या पराभवाचं आत्मचिंतन करायला हवं, असं फडणवीस म्हणाले. 'सत्तेत असताना, विरोधात असताना नागपूर जिल्हा परिषद आमच्याकडे होती. कित्येक वर्षे आमची जिल्हा परिषदेत सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत आम्हाला २१ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेचे ८ उमेदवार निवडून आले होते. तिथे आम्ही एकत्र सत्तेत होतो. मात्र यंदा आम्ही एकटे लढलो. तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवली. तिथे महाविकास आघाडी नव्हती. महाविकास आघाडीचं राजकीय गणित आमच्यासाठी नवं आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी, हे राजकीय गणित समजून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल,' असं फडणवीस यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असंही फडणवीस म्हणाले.नागपूर जिल्हा निवडणुकीत गेल्यावेळी आम्ही एकत्र लढलो. त्यावेळी शिवसेनेच्या ८ जागा निवडून आल्या होत्या. यंदा शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा मिळाली, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली असली तरीही राज्यात भाजपाचा क्रमांक एकचा पक्ष असल्याची आकडेवारी त्यांनी दिली. सहा जिल्हा परिषदांमध्ये मिळून भाजपाला १०३ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीमध्येही भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले. 

नागपूर जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा?काँग्रेस- ३०भाजपा- १५राष्ट्रवादी- १०शिवसेना- १इतर- २ 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसZP Electionजिल्हा परिषद