शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

Exclusive- नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापे कारवाईने कांदा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:40 IST

नाशिक जिल्ह्यात सात बड्या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी धाडी टाकल्या.

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यात सात बड्या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी धाडी टाकल्या. व्यापाऱ्यांची कार्यालयं, निवासस्थान व कांद्याची खळे येथे सकाळी पावणेसात वाजताच प्राप्तीकर विभागाच्या नाशिकच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

- योगेश बिडवई

मुंबई, दि.14 - नाशिक जिल्ह्यात सात बड्या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी धाडी टाकल्या. व्यापाऱ्यांची कार्यालयं, निवासस्थान व कांद्याची खळे येथे सकाळी पावणेसात वाजताच इन्कम टॅक्स विभागाच्या नाशिकच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.  कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासगावातील दोन, चांदवडमधील एक, सटाणा येथील एक बडा व्यापारी, पिंपळगाव बसवंत येथील एक कांदा निर्यातदार,उमराणे येथील एक व येवला येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी घातल्या आहेत.

व्यापाऱ्यांच्या गेल्या महिनाभरातील कांद्याच्या खरेदी विक्री व्यवहारांची तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. कार्यालयातील सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. व्यापाऱ्यांच्या निवास्थानीही अधिकारी सर्व कागदपत्रे शोधत आहेत. व्यापाऱ्यांची कांद्याची खळेही सील करण्यात आली असून तेथे कांदा साठवणुकीची माहिती घेतली जात आहे. कांद्याची खरेदी केल्यानंतर व्यापारी तो माल खळ्यावर नेतात, तेथून कांदा निवडून तो परराज्यात पाठविण्यात येतो. लासलगावातील एक बडा व्यापारी व कांदा निर्यातदाराकडे सकाळीच अधिकारी आले होते. त्यांनी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. या व्यापाऱ्याकडे 1998 पासून आतापर्यंत तब्बल 15 वेळा धाडी पडल्या आहेत. मात्र या व्यापाऱ्याकडे इनकम टॅक्स  विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अनियमितता किंवा कर चुकविल्याचे आढळलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सटाणा येथील एक व्यापारीही गेल्या काही वर्षात मोठी उलाढाल करणारा व्यावसायिक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मालेगाव तालुक्यातील उमराणे ही कृषी उत्पन्न बाजार समितीही कांद्याच्या मोठ्या उलाढालीसाठी ओळखली जाते. येवला येथेही काही व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करतात. गेल्या महिन्यात घाऊक बाजारपेठेत कांदा 2800 रुपये क्विंटल झाला. मात्र त्यानंतर भावात घसरण होत आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला क्विंटलमागे 1200 ते 1500 रुपये भाव आहे. 

व्यापारी लिलावात सहभागी नाहीजिल्ह्यात कांदा  व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी आज लिलावात सहभाग घेतला नाही. पुढील  दिशा ठरविण्याकरीता तातडीची बैठक सुरू झाली असून बाजार समितीमध्ये लिलाव कामकाज ठप्प झालं आहे. बाजार समितीचे  सभापती  जयदत्त होळकर, सचिव बी.वाय.होळकर व   सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे व्यापारी यांचेबरोबर विचार  विनीमय करण्याकरिता  कांदा लिलावात दाखल झाले आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये आज आतापर्यंत 300 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली आहे.