उत्साह, शिस्तीचा थरथराट..
By Admin | Updated: August 19, 2014 00:15 IST2014-08-19T00:15:52+5:302014-08-19T00:15:52+5:30
कोर्टाचे नियम, पोलिसांची बंधने, मतमतांचा गलबला, हंडीमागे दडलेले पॉलिटिक्स या सगळ्य़ा मळभाला झटकून ठाण्यातील गोविंदांनी अभूतपूर्व जल्लोषात बक्षिसाची माखनचोरी केली.

उत्साह, शिस्तीचा थरथराट..
ठाणो : कोर्टाचे नियम, पोलिसांची बंधने, मतमतांचा गलबला, हंडीमागे दडलेले पॉलिटिक्स या सगळ्य़ा मळभाला झटकून ठाण्यातील गोविंदांनी अभूतपूर्व जल्लोषात बक्षिसाची माखनचोरी केली. शिवसेनाप्रणीत मंडळांनी सगळे नियम व कायदे पाळून दहीहंडी साजरी केली, तर मंत्र्यांच्या दहीहंडीत खुलेआम कायदे, नियम यांची हंडी फोडून दहीहंडी झाली.
लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या डोंबिवलीतील दहीहंडीत साजरे झालेले अभिमान गीत या सोहळ्य़ाला चार चाँद लावणारे ठरले. मॅट, हंडी फोडणा:या गोविंदाने डोक्यावर चढविलेले हेल्मेट, अंगात घातलेले लाइफ ज्ॉकेट व वापरलेला लाइफ बेल्ट अशा अनेक वैशिष्टय़ांनी या वेळेचे गोविंदा सज्ज होते. तीही या उत्सवाची नवलाई होती.
सकाळपासूनच ढाक्कुमाक्कूमच्या तालावर दुचाकी, कार्स, उघडे टेम्पो, ट्रक्स, ट्रॅक्टर ट्रॉली, रिक्षा यातून गोविंदा जग जिंकण्याच्या आवेशात निघाले. तसे प्रत्येक महानगर, गाव, शहर, गल्ली, चौक गोविंदा आणि दहीहंडीमय होऊन गेले. मध्यरात्रीर्पयत हा जल्लोष सुरूच होता.
सेलब्रिटींच्या साथीने मच गया शोर सारी नगरी रे.., गोविंदा रे गोपाळाबरोबरच ही पोळी साजूक तुपातली.., गो गो गो गोविंदाच्या तालावर थिरकत, हंडीतील लाखमोलाचे लोणी चोरण्यासाठी निघालेल्या गोविंदा पथकांचा उत्साह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिसला.
1सोमवारी सकाळपासूनच ठाण्यातील नाक्यानाक्यावर दहीहंडीचा जल्लोष रंगला होता. ठाणो आयुक्तालय क्षेत्रत 1,778 तर ठाणो शहरात एकूण 7क्6 दहीहंडय़ा उभारण्यात आल्या होत्या. गल्लीबोळातील हंडय़ा दुपार्पयत फुटल्या तर शहरातील प्रमुख हंडय़ांमधील थरथराट रात्रीर्पयत कायम होता. पावसाने दांडी मारल्यामुळे गोविंदा काहीसे हिरमुसले होत़े परंतु ठिकठिकाणच्या उत्सवातील पाण्याच्या फवा:यांनी पावसाची कसर भरून काढली. तर लालबागच्या राजेंद्र आंबेकर या 49 वर्षीय गोविंदाचा नाचताना हॉर्टअॅटॅकने मृत्यू झाल्याने या उत्सावाला मात्र काहीसे गालबोट लागले. त्याच्या कुटुंबीयाना आमदार सरनाईक यांच्या मंडळाने दोन लाखांची मदत जाहीर केली़
2संघर्ष सेवाभावी संस्था, संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, टेंभीनाक्याची हंडी, आनंद चॅरिटेबल ट्रस्टची हंडी या प्रमुख हंडय़ा फोडण्यासाठी ठाण्यासह मुंबईतील सुमारे 5क्क् हून अधिक पथकांनी गर्दी केली होती. महत्त्वाच्या हंडय़ांसह इतर छोटय़ामोठय़ा हंडय़ा फोडण्यासाठी ठिकाणी पुरुषांसह महिला गोविंदा पथकेही तेवढय़ाच जोशाने ठाणो नगरीत दाखल झाली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात यंदा अशोक हांडे यांनी सादर केलेला कृष्णक्रीडा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.
3 सकाळी 1क् वाजल्यापासून सुरू झालेल्या या उत्सवात थरांची स्पर्धा नसल्याने पथकांना शक्य होतील तितकेच थर लावण्याची विनंती केली होती. सायंकाळी 6 वाजता हा उत्सव समाप्त करण्यात आला. तर टेंभी नाका येथील प्रसिद्ध हंडीत अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच आनंद टॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जांभळी नाक्यावरील हंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी गर्दी केली होती. सांस्कृतिक कार्यक्रम आणि सायंकाळ नंतर सुरू झालेला लेझर शो हे खास आकर्षण ठरले. रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीकाला उत्सवात अनिल कपूर आदी कलावंतांनी हजेरी लावत गोविंदांना चिअर अप केले. या सर्व दहीहंडी उत्सवात सलामी देणा:या प्रत्येक पथकाला मानधन, सन्मानचिन्ह देण्यात आले.
4तर ओपन हाऊस येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षच्या दहीहंडीत 25 लाखाचे बक्षिस मिळविण्यासाठी दिवसभरात अनेक पथकांनी 1क् थरासाठी प्रयत्न केले. जोगेश्वरीच्या जय जवान मित्र मंडळाने दुपारी 9 थर लावून सलामी दिली. अभिनेते सचिन खेडेकर यांनी येथे उपस्थित राहून गोविंदांना शुभेच्छा दिल्या. तर स्पेनच्या कॅसर्लसनी मानवी मनोरा रचून दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. गोविंदा पथकांचे जत्थे आणि उत्सव पाहण्यासाठी ठाणोकर यामुळे शहरातील वाहतूक सायंकाळनंतर कोलमडली होती.