शिवसैनिकाच्या हत्येमुळे नाशकात खळबळ
By Admin | Updated: January 21, 2017 00:15 IST2017-01-21T00:15:10+5:302017-01-21T00:15:10+5:30
नाशिकमध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये रात्री

शिवसैनिकाच्या हत्येमुळे नाशकात खळबळ
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20 - नाशिकमध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये रात्री 10 वाजता अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात शेजवळचा मृत्यू झाला.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शेजवळ हा सेनेचा संभाव्य उमेदवार असल्याचीही माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शेजवळच्या खुनाने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याच्या कार्यालयात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. शेजवळ हा तुरुंगात असताना पोटनिवडणुकीत त्याच्या आईने निवडणूक लढवली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने 15 दिवसातच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान, पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून हल्लेखोरांचा तपास घेत आहेत. मात्र या घटनेने नाशिकमध्ये भीतीचं वातावरण आहे.