जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय!
By Admin | Updated: June 23, 2015 03:01 IST2015-06-23T03:01:52+5:302015-06-23T03:01:52+5:30
जादा पैसे देऊन आता मुंबईत हवा तेवढा एफएसआय मिळू शकेल अशी तरतूद असणारे गृहनिर्माण धोरण युती सरकारने आणले आहे. या धोरणातील काही तरतुदींना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता
जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय!
अतुल कुलकर्णी, मुंबई
जादा पैसे देऊन आता मुंबईत हवा तेवढा एफएसआय मिळू शकेल अशी तरतूद असणारे गृहनिर्माण धोरण युती सरकारने आणले आहे. या धोरणातील काही तरतुदींना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचाच विरोध होता; पण बिल्डरधार्जिण्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दवाब आणून या धोरणाचा मसुदा प्रकाशित करायला लावला आहे.
म्हाडाच्या एका बैठकीत हाउसिंग धोरण आपल्याला मान्य नाही, मला न विचारता ते बनवले आहे, असा आक्षेप मेहता यांनी घेतला होता. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी फाईलवर सही करण्याचा आग्रह धरल्याने मेहता यांना सही करण्यास भाग पडले, अशी माहिती समोर आली आहे. मात्र याविषयी अधिक बोलण्यास मेहता यांनी नकार दिला. धारावी सेक्टर ५च्या पुनर्विकासाबाबत या धोरणात काहीच नाही.