नागपूर वगळता सर्वत्र एसटीची परीक्षा सुरळीत
By Admin | Updated: July 10, 2017 05:38 IST2017-07-10T05:38:16+5:302017-07-10T05:38:16+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहायक (मॅकेनिकल) पदासाठी राज्यात रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.

नागपूर वगळता सर्वत्र एसटीची परीक्षा सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ नागपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहायक (मॅकेनिकल) पदासाठी राज्यात रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. नागपूरमध्ये अपात्र उमेदवारांनी घातलेला गोंधळ वगळता, उर्वरित जिल्ह्यांत ही परीक्षा सुरळीत पार पडल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
महामंडळात सहायकपदाच्या ३ हजार २९३ जागांसाठी ६१ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ७७ टक्के म्हणजे, ४६ हजार ९७० उमेदवारांनी परीक्षा दिली. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील ८० केंद्रांत परीक्षा सुरळीत झाली. गैरव्यवहार टाळण्यासाठी, उमेदवारांना आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत सोबत घेण्याची मुभा आहे. परीक्षेचा निकाल महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप करत परिक्षार्थ्यांनी गोंधळ घातला होता.