गुजरात, मध्य प्रदेशातील बियाण्याची अकोल्यात तपासणी !

By Admin | Updated: June 27, 2016 02:49 IST2016-06-27T02:49:15+5:302016-06-27T02:49:15+5:30

अप्रमाणित सोयाबीन, कापूस बियाण्याची राज्यात सर्रास विक्री !

Examine the seeds of seeds in Gujarat, Madhya Pradesh! | गुजरात, मध्य प्रदेशातील बियाण्याची अकोल्यात तपासणी !

गुजरात, मध्य प्रदेशातील बियाण्याची अकोल्यात तपासणी !

राजरत्न सिरसाट/अकोला
विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात अप्रमाणित सोयाबीन व बीटी कापूस बियाणे आले असून, यातील काही बियाण्याची विक्री करण्याची परवानगी नसताना, गुजरात व मध्य प्रदेशातील बियाणे सर्रास विकले जात आहे. अकोल्यात गुजरात व मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाण्याची सर्रास विक्री होत आहे. हे बियाणे कुठे प्रमाणित करू न घेतले, याची कृषी विभागाच्या पथकाने शनिवारी व रविवारी तपासणी केली; परंतु निदर्शनास आलेले बियाणे प्रमाणित केलेली कागदपत्रेच आढळली नसल्याचे वृत्त आहे. अकोल्यातील काही बियाणे विक्रेता प्रतिष्ठानांवरू न अप्रमाणित बियाण्याची विक्री होत असल्याने कृषी विभागाने शुक्रवारपासून चौकशी सुरू केली आहे. शनिवारी बियाणे गोडाउनची चौकशी करण्यात आली. काही बियाणे विक्रेत्यांकडे हे बियाणे आढळले. या बियाण्यासंदर्भात कृषी विभागाच्या चमूने कागदपत्रांची तपासणी केली; परंतु त्या प्रतिष्ठानांना बियाणे कोठून प्रमाणित केले, हे अद्याप सिद्ध करता आले नसल्याचे वृत्त आहे. परप्रातांतील बियाणे तसे विकता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी असणे गरजेचे आहे, शिवाय प्रमाणीकरण (सर्टिफाय ) केलेले बियाणे असावे. यासंबंधी चौकशी कृषी यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

विदर्भात सर्वाधिक अप्रमाणित बियाणे
विदर्भाला लागूनच मध्य प्रदेशची सीमा असल्याने असे बियाणे येथे आणणे सोपे आहे. मध्य प्रदेशातील इंदूर व इतर ठिकाणच्या बाजारातील सोयाबीन खरेदी करू न, ते ३0 किलोच्या गोण्यात भरू न त्यावर कंपन्याचे टॅग लावले जातात. तेच बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे.

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढतेच !
कापूस विदर्भातील प्रमुख नगदी पीक आहे; परंतु अलीकडच्या दहा वर्षांत कापसाला मागे टाकत शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर भर दिल्याने त्याचे क्षेत्र वाढले आहे. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र जवळपास ४0 लाख हेक्टर आहे. मागील वर्षी पाऊसच कमी असल्याने हे क्षेत्र घटून ३५.९0 लाख हेक्टरपर्यंत आले होते.

Web Title: Examine the seeds of seeds in Gujarat, Madhya Pradesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.