शाळेत पुन्हा परीक्षा!
By Admin | Updated: April 10, 2015 05:13 IST2015-04-10T05:13:42+5:302015-04-10T05:13:42+5:30
उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे

शाळेत पुन्हा परीक्षा!
मुंबई : उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाली आहे, हा मुद्दा राष्ट्रवादीच्या हुस्रबानू खलिफे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षण अधिकार कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचा चुकीचा अर्थ काढत काही शाळांनी परीक्षाच न घेण्याचे धोरण स्वीकारले. ही बाब चुकीची असून, प्रत्येक शाळेने परीक्षा घ्यायला हव्यात. परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची एक महिन्याची विशेष शिकवणी घ्यावी अशा सूचना सर्वच शाळांना पाठविण्यात येतील.