परीक्षेत महाराष्ट्र, तर निकालात कर्नाटक आघाडीवर
By Admin | Updated: March 25, 2015 01:18 IST2015-03-25T01:14:55+5:302015-03-25T01:18:30+5:30
दहावी, बारावी : उत्तरपत्रिका तपासणीसाठी स्वतंत्र केंद्र, निकाल वेळेवर लावण्याकडे विशेष लक्ष

परीक्षेत महाराष्ट्र, तर निकालात कर्नाटक आघाडीवर
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर प्रत्येक वर्षी दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आणि निकाल लावण्यात पिछाडीवर राहतो. याउलट एक महिना परीक्षा उशिरा घेऊनही निकाल लावण्यात कर्नाटक आघाडीवर आहे. प्रत्येक जिल्ह्यात उत्तरपत्रिकेच्या संख्येवर तात्पुरती तपासणी केंदे्र सुरू केली जातात. त्यामुळे कर्नाटकात महिन्यात निकाल लागतो. महाराष्ट्रात निकाल लावण्यासाठी जून महिना उजाडतो. गतवर्षी महाराष्ट्रात दहावीसाठी ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी पास झाले होते. एक लाख १९ हजार ५२७ विद्यार्थी नापास झाले होते. बारावीच्या परीक्षेस एक लाख ३१ हजार ४५२ विद्यार्थी बसले. पैकी ३८ हजार ७१८ उत्तीर्ण झाले होते. ९२ हजार ७३४ विद्यार्थी नापास झाले होते. यातील दोनपेक्षा अधिक विषयांत नापास झालेल्यांचे वर्ष वाया गेल्याने मोठा फटका बसला.
कर्नाटकात गेल्या वर्षी दहावीसाठी आठ लाख ३६ हजार ३४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी सहा लाख ४७ हजार ९५४ विद्यार्थी पास झाले होते. एक लाख ८८ हजार ३८८ विद्यार्थी नापास झाले होते. बारावीसाठी सहा लाख ११ हजार ५६९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन लाख ६३ हजार ५७ विद्यार्थी पास झाले. दोन लाख ४८ हजार ५१२ विद्यार्थी नापास झाले होते. दोन्ही परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना वर्ष वाया न घालविता पुढील वर्गात प्रवेश मिळाला.
महाराष्ट्रात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी शाळेतच जाऊन तपासाव्यात असा नियम आहे, पण तो धाब्यावर बसविला जात असल्याचीच चर्चा अधिक आहे. सुटीचा कालावधी असल्यामुळे अनेक शिक्षक घरीच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जातात. घरी पेपर तपासणी कोण करते यावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था नाही. कर्नाटकात उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात शिक्षकांनी जाऊन निर्धारित वेळेत पेपर तपासणी करणे बंधनकारक असते. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल लागतो.
गतवर्षी बारावीचा पुरवणी निकाल ३०.६४ टक्के
सन २०१४ या शैक्षणिक वर्षात बारावीच्या पुरवणी परीक्षेस बसलेल्या १ लाख ३१ हजार ३९० मुलांपैकी ३५ हजार ९६७ जण उत्तीर्ण झाले. ८७ हजार १४७ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ३१ हजार ३०९ मुली उत्तीर्ण झाल्या. दरम्यान, दहावीच्या मुख्य परीक्षेत नापास झालेल्यांपैकी पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे पुरवणी परीक्षा देतात. उर्वरित ९५ टक्के मुले परीक्षा देतात. गतवर्षी त्याचा निकाल २५ टक्के लागला होता. शाळानिहाय निकाल दिला जात असल्यामुळे एकत्रित दहावी पुरवणी परीक्षेत किती विद्यार्थी बसले व किती मुले उत्तीर्ण झाले याची सांख्यिकी तपशीलवार आकडेवारी कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षेच्या वेबसाईटवर वा कार्यालयात उपलब्ध होऊ शकत नाही, असे संचालक जयकुमार यांनी सांगितले.

पुरवणी परीक्षा घ्या
नापासांचे वर्ष वाचवा
२