माजी मिनी महापौरांच्या पतीची निर्घृण हत्या

By Admin | Updated: June 22, 2014 00:50 IST2014-06-22T00:50:24+5:302014-06-22T00:50:24+5:30

जुन्या वैमनस्यातून माजी मिनी महापौरांच्या (झोन सभापती) पतीवर सशस्त्र हल्ला चढवून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक हैदरपुरा परिसरात घडली.

The ex-mayor's husband's murderous murder | माजी मिनी महापौरांच्या पतीची निर्घृण हत्या

माजी मिनी महापौरांच्या पतीची निर्घृण हत्या

दोघे जखमी : हैदरपुऱ्यातील घटना
अमरावती : जुन्या वैमनस्यातून माजी मिनी महापौरांच्या (झोन सभापती) पतीवर सशस्त्र हल्ला चढवून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक हैदरपुरा परिसरात घडली. हबीब शहा ऊर्फ बशीर शहा (४८) असे मृताचे नाव आहे. तसेच जावेद शहा (२५), रशीद शहा बशीर शहा (३०) दोन्ही रा. नुरानी चौक अशी जखमींची नावे आहेत.
मृत हबीब शाह हे प्रभाग क्र. ३० च्या नगरसेविका तथा माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन हबीब शहा यांचे पती होत. नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत नुरानी चौकजवळील हैदरपुरा येथील रहिवासी हबीब शाह व भाचा जावेद शहा हे दोघे घरासमोर खुर्च्या टाकून बसले होते.
सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी अचानक सात ते आठ हल्लेखोरांनी हबीब शहा यांच्यावर चाकू हल्ला चढविला. हबीब शहा यांच्या मांडीवर चाकूचे तीक्ष्ण वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हे पाहून जावेद याने हल्लेखोरांचा विरोध केला असता जावेदवरही हल्ला चढविल्याने तो जखमी झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या हबीब शहा यांना जावेद याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र हबीब शहा यांचा रक्तस्त्राव अधिक प्रमाणात झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, हबीब शहा यांचा भाऊ रशीद शहा बशिर शहा यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घरी धाव घेतली असता त्यांच्यावरही हल्ला चढविल्याने तेसुद्धा जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा वाद महापालिका निवडणुकीपासून आहे. मृतहबीब शहा यांच्या घरासमोरील रहिवासी शेख हबीब यांच्यात जुना वाद होता. यापूर्वी तीन वेळा हबीब शहा यांच्यावर हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The ex-mayor's husband's murderous murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.