शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

EVM हॅकिंग: सय्यद शुजाच्या दाव्यांबाबत पंकजा मुंडेनी सोडले मौन, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:37 IST

अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे.

मुंबई - भाजपाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या EVM हॅकिंगबाबत माहिती असल्याने झाल्याचा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. "मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी सय्यद शुजा याने केलेल्या खळबळजनक दाव्यांबाबत प्रथमच मौन सोडले. ''मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान ही मागणी पूर्ण झाली आहे, तसेच त्यातून माझे समाधानही झाले आहे. आता याबाबत अधिक चौकशी करायची असेल तर देशातील मोठे नेते निर्णय घेतील.''असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच EVM हॅक होऊ शकत नाही हे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.  2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केला होता. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत या प्रकरणी मौन पाळले आहे.  

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण