प्रत्येकाला खरी शक्ती कळेल - भुजबळ

By Admin | Updated: September 27, 2014 04:45 IST2014-09-27T04:45:48+5:302014-09-27T04:45:48+5:30

शिवसेना-भाजपात अनेक दिवस चर्चा होऊन महायुती तुटली. आमच्यात प्रत्यक्षात एकच बैठक झाली. त्यातही निर्णय झाला नाही

Everyone will know the real power - Bhujbal | प्रत्येकाला खरी शक्ती कळेल - भुजबळ

प्रत्येकाला खरी शक्ती कळेल - भुजबळ

नाशिक : शिवसेना-भाजपात अनेक दिवस चर्चा होऊन महायुती तुटली. आमच्यात प्रत्यक्षात एकच बैठक झाली. त्यातही निर्णय झाला नाही. आता सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याने प्रत्येकाला खरी शक्ती कळेल, असे राष्ट्रवादीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
ठरलेल्या सूत्रानुसार कार्यवाही होण्याआधीच काँग्रेसने राष्ट्रवादीच्या दोन जागांवर उमेदवार घोषित केले. त्यामुळे आघाडी तुटण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. देवीदास पिंगळे व शिवाजी चुंबळे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते. आम्हाला सर्व २८८ जागी उमेदवार उभे करावे लागणार असून, आमची तशी तयारी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Everyone will know the real power - Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.