शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी- नयनतारा सहगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 10:50 IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द झाल्यानंतर सहगल यांचा भाजपावर निशाणा

मुंबई: साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आलं असावं, असं प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीची लाज वाटायला हवी असं देखील सहगल म्हणाल्या आहेत. माझ्या भाषणाला मुख्यमंत्री बहुतेक घाबरले असावेत असा टोला नयनतारा सहगल यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी अचानक रद्द केलं. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला. यामुळे आश्चर्य वाटल्याचं सहगल यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. 'माझ्या भाषणातून मी देशातील सद्यस्थितीवर बोलणार होते. माझं भाषण मी आयोजकांना पाठवलं होतं. त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत, याची मला कल्पना नव्हती. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित माझं भाषण आवडलं नसेल,' असं सहगल म्हणाल्या.गोवंश, गोमांसावरुन होणाऱ्या हत्या, द्वेषाचं राजकारण, लेखकांचे-विचारवंतांचे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी, असं मत सहगल यांनी व्यक्त केलं. 'हा देश फक्त हिंदुंचा आहे, असं काहींना वाटतं. मात्र हा देश हिंदुस्तानातील प्रत्येकाचा आहे. गेल्या काही काळात अनेक विचारवंत आणि लेखकांच्या हत्या झाल्या. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांनी जीव गमावला. प्रख्यात व्यक्तींचे खून झाले. तर आपल्याला माहीत नसलेले अनेकजण जमावाकडून मारले गेले. गोमांस सापडल्याच्या संशयावरुन, गायींच्या तस्करीच्या अफवेवरुन हिंसाचार सुरू आहे. जमावाकडून खून पाडले जात आहेत. या हल्लेखोरांना सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. देशातील या परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी,' अशी भावना सहगल यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनBJPभाजपा