शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’च्या गोंधळामुळे सगळ्यांनाच टेन्शन..., विद्यार्थी पालक घेत आहेत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:20 IST

NEET Exam News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भवितव्याबाबत संभ्रम आणि अनिश्चितता आहे.  त्यामुळे ते मानसिक तणावात असून, अनेकांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे.

 नांदेड - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भवितव्याबाबत संभ्रम आणि अनिश्चितता आहे.  त्यामुळे ते मानसिक तणावात असून, अनेकांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे कोचिंग क्लास चालकांनीही मानसोपचारतज्ज्ञांकडे अशा परिस्थितीत काय करावे? याबाबत सल्ला मागितला आहे.

सोशल मीडियावर ‘नीट’ची लखनौ येथील विद्यार्थिनी आयुषी पटेल हिचा मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनटीएच्या गोंधळामुळे ही मुलगी तणावात गेली असून, सोशल मीडियावर मदतीची भीक मागत आहे. नांदेडातही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयातही ‘नीट’बाबत कोणताच निर्णय अद्याप घेण्यात आला नाही.

कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा व्हावी, असे वाटते, तर चांगले मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा झाल्यास आपल्याला चांगले गुण मिळतील काय? अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक तणावात आले आहेत.

मानसोपचाराचा सल्लासततची बेचैनी, थरथर, झोप न लागणे, भूक कमी होणे, डोक्यात तोच तो विचार, ही विद्यार्थ्यांच्या तणावाची लक्षणे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोचिंग क्लासेस चालक हे देखील मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी अशा नाजूक समयी संयम ठेवणे गरजेचे आहे. स्वत:वर विश्वास ठेवावा. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. घडत असलेल्या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि काही निर्णय आल्यास न डगमगता योग्य तो निर्णय जास्त काळ गोंधळात न राहता घ्यावा. - डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र