‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’

By Admin | Updated: January 1, 2015 02:36 IST2015-01-01T02:36:01+5:302015-01-01T02:36:01+5:30

नागपूरमध्ये आगामी काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.

'Everybody wants your metro' | ‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’

‘सर्वांना आपली वाटेल मेट्रो’

नागपूर : नागपूरमध्ये आगामी काळात धावणारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबाबत नागपूरकरांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मात्र प्रत्येक नागपूरकरांना आपली वाटेल अशी ती असेल व ज्यामुळे नागपूरच्या रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण कमी अशा पद्धतीने हा प्रकल्प राबवू, असा विश्वास मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
दीक्षित मंगळवारपासून नागपूरमध्ये आहेत. विविध अधिकारी, तंत्रज्ञ यांची भेट घेऊन ते ‘मेट्रो रेल्वे’प्रकल्पाविषयी चर्चा करीत आहे. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बुधवारी संवाद साधला व या प्रकल्पाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व पर्यटकांना या प्रकल्पाचा लाभ होईल़ त्यामुळे सर्वांना नागपूरची मेट्रो ही आपली वाटेल, ‘माझी मेट्रो’ असे म्हणत नागपूरकर यावर गर्व करतील , अशा पद्धतीने या प्रकल्पाचा विकास करण्याचे प्रयत्न राहील, असे दीक्षित म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Everybody wants your metro'