शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:37 IST

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरोधात लढायचे आहे : फारूख अब्दुल्ला   छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात अनेक नेत्यांची जोरदार फटकेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही शक्तींकडून द्वेष पसरवला जात आहे. देशातील लोकांमध्ये विभागणी केली जात आहे. या शक्ती देशाला कमजोर करणार असून, त्याविरोधात लढायचे आहे. तरच हा भारत मजबूत होऊ शकेल, असे आवाहन जम्मू ॲण्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी मुंबईत बोलताना केले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुजबळांबद्दल गौरवोद्गार काढले. 

आज देशाची अवस्था काय आहे ते बघा. महागाई कुठे पोहोचली आहे. गरीब पिचला जातोय. मुले शिकलेली आहेत, पण नोकरी नाही. देव आणि अल्लाच या संकटातून बाहेर काढू शकतो, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.राजकीय पार्श्वभूमी नसताना एखादी व्यक्ती महापौर होते, विरोधी पक्षनेते, मंत्री, उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचते आणि महाराष्ट्राला दिशा देते, असे उदाहरण म्हणजे छगन भुजबळ, अशा शब्दांत शरद पवारांनी भुजबळांवर कौतुकाचा वर्षाव केला. प्रफुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेबांचे खरे वारसदार असा केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

लढाईच्या क्षणाची वाट बघतोय शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली. मात्र त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी ही वादळे व वादळ निर्माण करणारे शरद पवार सोबत नव्हते. आता हे सगळे सोबत असताना मी लढाईच्या क्षणाची वाट बघतो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावे लागते. हिम्मत असेल तर मैदानात या, माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.

शिवसेनेचे १५ आमदार गेले त्यावेळी ठाकरे यांनी त्यांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असती तर ते त्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.    - अजित पवार, राष्ट्रवादी

पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे. यात मशालीबरोबर हात आहे आणि हाताबरोबर घड्याळ आहे. चिंता करू नका.     - बाळासाहेब थोरात, काँग्रेस

प्रत्येकाची विचारधारा मान्य करण्याची या देशाची परंपरा आहे. यामुळेच लोकशाही जिवंत राहते. जिथे जिथे आम्ही बोलतोच ते योग्य तिथे लोकशाही कशी असू शकेल ?      जावेद अख्तर, गीतकार

भुजबळ झाले भावनिक आम्ही खूप कष्ट घेतले. सकाळी तीन वाजता मार्केटमध्ये जायचो, भाजी विकायचो. लोक बोलतात एवढी संपत्ती कुठून आली, अरे लहानपणापासून मेहनत केली आहे, अशा आठवणींना भुजबळांनी यावेळी उजाळा दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChagan Bhujbalछगन भुजबळ