शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 21:54 IST

'उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे.'

Maharashtra Politics: २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावा हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय  बहुमत सुद्धा महत्वाचे असते." ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले," नगर पंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवकांवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

• तुम्ही मोदीजींचे फोटो लावूनच जिंकले!उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा पंतप्रधान श्री  नरेंद्र मोदीजी व अमितभाई शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. शिवसेनेचे आमदार मोदीजींचे फोटो लावून निवडून आणले आहेत. युतीत असताना मोदीजींचे तोंडभरून कौतुक करीत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसल्यावर मोदीजींविषयी एकेरी बोलू नये, अन्यथा चुकीतून चूक होते. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

• लोकाधिकार अबाधित ठेवून निर्णय रिफायनरी बारसू येथेच व्हावी यासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट पत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला दिले होते. त्याचवेळी ठाकरे यांनी लोकसुनावणी घेतली असती तर त्यांना आता बोलता आले असते. बारसू प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर नेते याबाबत जनतेचे अधिकार अबाधित राखून योग्य निर्णय घेतील, अशी आशा मला आहे. 

बार्शी टाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. यातून कॉंग्रेसचे बेगडी प्रेम समोर आले. याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी मी करतो.- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस