प्रत्येक जिल्ह्यात होणार मनोधैर्य चमूचे गठण
By Admin | Updated: September 12, 2014 00:28 IST2014-09-12T00:28:20+5:302014-09-12T00:28:39+5:30
महिला अत्याचारांना प्रतिबंध : प्रशासनाचा पुढाकार

प्रत्येक जिल्ह्यात होणार मनोधैर्य चमूचे गठण
बुलडाणा : लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला तसेच बालकांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेची आता जिल्हास्तरावरही अमंलबजावणी केली जाणार असून, त्यासाठी जिल्हास्तरावर मनोधैर्य चमूचे गठण केले जाणार आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितांना आधार देण्याचे आणि त्यांना मानसिक धक्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे काम चमू करणार आहे. प्रत्येक जिलत अशी मनोधैर्य चमू गठित करण्याबाबत शासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना सूचना दिल्या आहेत.
जिल्हास्तरावरील चमूमध्ये एक पोलीस अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा तथा तालुकास्तरावरील रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारीका, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल परिविक्षा अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश केला जाणार आहे.
लैंगिक अत्याचाराने पीडीत बालकाची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळण्याचे प्रशिक्षण या चमुतील सदस्यांना दिले जाणार आहे.