सध्या विरोधकांकडून भाजपवर मतचोरीचा आरोप होत आहे. यासंदर्भात बोलताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. "तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व यश मिळालं. तुम्ही या यशाने आनंदी आहात. पण काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत मिळाले, तरीही सुधारायला तयार नाहीत. रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे. त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ते शनिवारी मुंबईत ओयोजित 'राखी प्रदान' कार्यक्रमात बोलत होते.
प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात, राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राख्या पाठविल्या, या निमित्ताने या ''राखी प्रदान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे फडणवीस म्हणाले, "माझी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की, यांच्यासाठीही २५ टक्के आशीर्वाद मागा की, यांना सुबुद्धी येवो, यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो. कारण खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर, यांच्या पेक्षा मोठे चोर कोण आहेत? तर कोणीच नाही. म्हणून त्याची चिंता करण्याचे कारण नाही."
मोदींच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे -"हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण, ना यांना परदेशात कुणी विचारलं, ना यांना बिहारमध्ये कुणी विचारणार आहे, जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये होणार आहे. कारण, मोदीजींसारखा नेता, जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशाची मातृशक्ती उभी आहे," असे फडणवीस म्हणाले.
विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर... -याशिवाय, "तुम्ही कुठलीही निवडणूक बघा. मोजी आल्यापासून २०१४ पासून जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला, या प्रत्येक निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होते, तेव्हा विश्लेषक सांगतात की, मोदीजी का जिंकले? तर मोदीजींना पुरुषांच्या तुलनेत महिलांनी पाच टक्के मतं अधिक दिले. हे प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण असते. कारण महिलांना माहीत आहे की, खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पीढ्याचे कल्ल्याण जर कुणी करणार आहे, तर ते मोदीजीच करणार आहेत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.