अखेर रेल्वेने दिली वारक-यांना प्रवास सवलत
By Admin | Updated: July 24, 2015 00:43 IST2015-07-24T00:43:03+5:302015-07-24T00:43:03+5:30
विठ्ठल दर्शन एक्सप्रेस प्रवासात ज्येष्ठ नागरीक व महिलांना मिळणार लाभ.

अखेर रेल्वेने दिली वारक-यांना प्रवास सवलत
खामगाव : खामगाव व अमरावती येथून आषाढ वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूर येथे जाणार्या विठ्ठल दर्शन एक्स प्रेसमध्ये गेल्या १२ वर्षापासून दिली जाणारी ज्येष्ठ महिला व बालकांना ५0 टक्के तर ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के प्रवास भाडे सवलत यावर्षी रेल्वेने नाकारली होती. ह्यलोकमतह्णने या मुद्याचा प्रभावी पाठपुरावा केल्यानंतर तिसर्या फेरीपासून रेल्वेने विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये या सवलती अखेर लागू केल्या.
रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के, तसेच ज्येष्ठ महिला आणि १८ वर्षाखालील बालकांना ५0 टक्के सवलत दिली जाते. गेल्या १२ वर्षांंंंंंपासून खामगाव व अमरावती येथून निघणार्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये ही नियमीत सवलतही नाकारण्यात आली होती. लोकमतने हा मुद्दा प्रभावीपणे रेटून धरल्यानंतर विविध संघटना आणि मान्यवर रस्त्यावर आले. खामगाव येथील रेल्वे स्थानकावर १७ जुलै रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. याशिवाय खा. प्रतापराव जाधव यांनीही रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून प्रवास सवलती लागू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. एवढेच काय, मारवाडी युवा मंचने भाड्यातील तफावतीची रक्कम वारकर्यांना देण्याचे जाहीर केले होते. या आंदोलनांची दखल घेत अखेर रेल्वेने श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसमध्ये ज्येष्ठ पुरुषांना ३0 टक्के, तर ज्येष्ठ महिला व बालकांना ५0 टक्के सवलत प्रवास भाड्यामध्ये देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खामगाव रेल्वे स् थानकास प्राप्त झाले असून, २४ जुलै रोजी निघणार्या तिसर्या फेरीपासून तो लागू होणार आहे.