अखेर शनी चौथ-यावर महिलांकडून पुष्पहार आणि फुलं अर्पण
By Admin | Updated: April 8, 2016 17:28 IST2016-04-08T17:26:04+5:302016-04-08T17:28:42+5:30
400 वर्षांची परंपरा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंमुळे शनी देवस्थान विश्वस्तांनी मोडीत काढली आहे.

अखेर शनी चौथ-यावर महिलांकडून पुष्पहार आणि फुलं अर्पण
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ७- भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी अखेर शनी चौथ-यावर प्रवेश केला आहे. 400 वर्षांची परंपरा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंमुळे शनी देवस्थान विश्वस्तांनी मोडीत काढली आहे. दोन महिलांनी शनिदेवाला पुष्पहार आणि फुलं अर्पण केली आहेत.
आतापर्यंत शनी मंदिराच्या चौथ-याच्या दर्शनाला गावक-यांचा आणि शनी देवस्थान समितीचा विरोध होता. मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर देवस्थान समितीनं नरमाईची भूमिका घेत भूमाता ब्रिगेड आणि महिलांना शनीच्या चौथ-यावर जाण्यास परवानगी दिली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयामुळे स्त्री - पुरुष भेदभाव दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तर याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी देवस्थाननं उशिरा का होईना योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी शनी चौथ-यावर जाऊन पुष्पहार आणि फुलं शनिदेवाला वाहिली आहेत.