शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 06:05 IST

ओबीसीतूनच आरक्षण, सगेसोयरे मुद्द्यांवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाज बांधवांच्या विनंतीनुसार सोमवारी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले. संचारबंदीमुळे समाज बांधवांना अंतरवाली सराटीत येता येत नाही. त्यामुळे दोन-चार दिवस उपचार घेऊन राज्यातील गावागावांत जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. 'सग्यासोयऱ्यां'ची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

रविवारी रात्री पाच हजार महिला, २५ हजार लोक सोबत होते. त्यांना काहीतरी घडवून आणायचे होते. पोलिस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती, तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता, तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. माझ्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे नाव घेऊन आरोप झाले. परंतु राजकारण आपल्या डोक्यातच नाही. आपल्याला समाजाला आरक्षण द्यायचे आहे. यामुळे अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुम्हाला संधी आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये. तुम्ही चक्रव्यूह रचले होते, परंतु आम्ही डाव उधळून लावला आहे. नवनवीन डाव टाकून नाराजी ओढावून घेऊ नका. या अधिवेशनात सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. १० टक्के आरक्षण मी स्वीकारू शकत नाही. ओबीसीतूनच आरक्षण हवे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण