ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊनही चुकेना रांग
By Admin | Updated: August 3, 2014 00:31 IST2014-08-03T00:31:23+5:302014-08-03T00:31:23+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा गाजावाजा करून राज्यात पहिल्यांदा लर्निग लायसन्ससाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली.

ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊनही चुकेना रांग
पुणो : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोठा गाजावाजा करून राज्यात पहिल्यांदा लर्निग लायसन्ससाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर अपॉइंटमेंट मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, एजंटांकडून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देऊन ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आलेल्यांना रांगेत ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे.
आरटीओ कार्यालयामध्ये 15 दिवसांपासून लर्निग लायसन्सकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. यामध्ये लर्निग लायसन्सकरिता ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रत घेऊन दिलेल्या वेळी आरटीओ कार्यालयात यायचे. त्या वेळी त्यांची लगेचच परीक्षा घेऊन लर्निग लायसन्स हातामध्ये दिले जाणो अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात याच्या उलटेच चित्र पाहायला मिळत आहे.
याबाबत जॉन पीटर म्हणाला, ‘‘फॉर्म भरल्यानंतर सकाळी अकराची वेळ देण्यात आली होती; मात्र दुपारचे तीन वाजले तरी माझा नंबर आलेला नाही.
एजंटांना बाजूला करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी येथील अधिका:यांना एजंट जावेत, असे वाटत नाही. एजंटांकडून आलेल्या उमेदवारांनाच येथे जास्त प्राधान्य दिले जाते.’’ इरफान शेख म्हणाला, ‘‘दोन तास थांबल्यानंतर माझा नंबर आला; मात्र कागदपत्रंमध्ये खुसपट काढून मला परत पाठविण्यात आले. एजंटांकडून आलेल्यांची कागदपत्रे न तपासताच त्यांना लायसन्स दिले जाते. येथील परिस्थिती पाहून मला लायसन्स मिळेल, असे वाटत नाही.’’
एका महिलेने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, ‘‘अनेक वर्षापासून मी लायसन्स न काढताच गाडी चालवत आहे. ते बेकायदेशीर आहे हे मला माहीत आहे. मात्र, लायसन्स वितरित करण्याची यंत्रणा पाहिली, की बिगरलायसन्सची गाडी चालविणोच योग्य आहे, असे मला वाटते.’’ (प्रतिनिधी)
‘गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या मोठय़ा पावसामुळे सिस्टीमध्ये पाणी गेले; त्यामुळे यूपीएस खराब झाला आहे. यामुळे ऑनलाईन अपॉइंटमेंटमध्ये
अडचणी येत आहेत. यंत्रणोची दुरुस्ती पूर्ण झाली असून, लवकरच यंत्रणा पूर्वपदावर येईल. लर्निग लायसन्सकरिता आता टोकन सिस्टीम सुरू करण्याचा विचार आहे.’’
जितेंद्र पाटील
प्रादेशिक परिवहन अधिकारी