मुंबईतही थंडी !

By Admin | Updated: January 15, 2015 05:31 IST2015-01-15T05:31:16+5:302015-01-15T05:31:16+5:30

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट कायम आहे

Even in Mumbai! | मुंबईतही थंडी !

मुंबईतही थंडी !

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट कायम आहे. तर दुसरीकडे गेल्या पाचेक दिवसांपासून मुंबईचे किमान तापमानदेखील १५ अंशाचे वर सरकलेले नाही. परिणामी मुंबईही गारठलेली असून, येथे दिवसापेक्षा रात्रीच्या हवेतील गारवा अधिक आहे.
गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यात आलेली थंडीची लाट कायम आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Even in Mumbai!